
ऐन पावसाळ्यात तीन दिवसांपूर्वी दोन्ही नदी पात्रे ठणठणीत कोरडी होती. दोन दिवसांपूर्वीच पंढरपूरला पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले. तर मागील दोन दिवसापासून बावडा परिसरात वरून राजाने हजेरी लावल्याने जोरदार झालेल्या पावसामुळे नीरा नदीतही प्रवाहित पाणी आल्याने या दोन्ही नद्या वाहू लागल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बावडा : ऐन पावसाळ्यात तीन दिवसांपूर्वी दोन्ही नदी पात्रे ठणठणीत कोरडी होती. दोन दिवसांपूर्वीच पंढरपूरला पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले. तर मागील दोन दिवसापासून बावडा परिसरात वरून राजाने हजेरी लावल्याने जोरदार झालेल्या पावसामुळे नीरा नदीतही प्रवाहित पाणी आल्याने या दोन्ही नद्या वाहू लागल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन्ही नद्यांचे पात्र पावसाळ्यात ही कोरडे पडले होते. या मार्गावरून जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये टँकरनेच स्नान घालण्याची वेळ आली होती. तर या दोन्ही नद्या व ओढे, नाले पाझर तलाव कोरडे असल्याने तसेच अनेक विहिरी अटल्याने उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनाचा प्रश्न बिकट झाला होता. तर उसासारखे नगदी पिके जळून चालली होती, पावसामुळे शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनांना जीवदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दोन दिवसात बावडा परिसर 145 मि.मी. पाऊस झाला तर खुद्द बावड्यात 82 मि.मी. नोंद झाली आहे.
परिसरामध्ये दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ नाले थोड्या प्रमाणात वाहू लागले आहे. तर येथील खंडोबा नगर परिसरातील पाझर तलाव ही भरला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणारा असल्याचे माजी सरपंच किरण काका पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यामध्ये मृग नक्षत्रासह पावसाची भरवशाची नक्षत्र कोरडी गेली होती. पिण्याच्या पाण्याच्या योजना कोलमडल्या होत्या, तर उसासारखी नगदी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असतानाच गणेश उत्सव काळात दमदार पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती बदलली आहे. त्यामुळे श्री. गणेशाचीच कृपा अशी भावना शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये झाली आहे. मात्र पूर्ण दुष्काळ हटण्यासाठी आणखी अशा दमदार पावसाची आवश्यकता आहे. असे मत येथील प्रगतशील शेतकरी व मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक महादेवराव घाडगे यांनी व्यक्त केली.