The headmaster was killed and his co-teacher was seriously injured in a head-on collision with an unidentified vehicle

अपघातात मृत झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव किशोर मद्देर्लावार (५३) आहे. तर, जखमी असलेल्या सहकारी शिक्षकाचे नाव रमेश गौरकर (५०) आहे. मद्देर्लावार व गौरकर हे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजे धर्मराव शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव आश्रम शाळेत कार्यरत होते. शाळेचे ऑडिट असल्याने दोघेही मोटारसायकलने मन्नेराजाराम गावाकडे जात होते.

    अहेरी : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने खासगी आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर, यात सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना २५ तारखेला सकाळी ११ वाजताच्या सुमारास आलापल्ली- भामरागड मार्गावरील मिरकल फाट्यावर घडली. अपघातात मृत झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव किशोर मद्देर्लावार (५३) आहे. तर, जखमी असलेल्या सहकारी शिक्षकाचे नाव रमेश गौरकर (५०) आहे.

    मद्देर्लावार व गौरकर हे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजे धर्मराव शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव आश्रम शाळेत कार्यरत होते. शाळेचे ऑडिट असल्याने दोघेही मोटारसायकलने मन्नेराजाराम गावाकडे जात होते. मिरकल फाट्यावर पोहचताच समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मुख्याध्यापक किशोर मद्देर्लावार जागीच ठार झाले तर, रमेश गौरकर गंभीर जखमी झाले.

    गौरकर यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला रवाना करण्यात आले आहे. घटनेची माहिती आलापली परिसरात माहिती होताच सर्वत्र शोकाकूल वातावरण निर्माण झाले असून मृत झालेल्या मुख्याध्यापकांची पत्नी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.