संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आळंदी पंचक्रोशीत २२ विहिरी, १ सार्वजनिक विहिर, १४९ खाजगी बोअरवेल, ९ सार्वजनिक बोअरवेल, १६ सार्वजनिक नळ आदी ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास आले आहेत. यामध्ये सर्व संबंधित ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून शुद्धीकरणासाठी तसेच सर्व जलस्त्रोतांचे ओटी टेस्ट दिवसातून दोन, तीन वेळा घेण्यात येत आहेत.

    आळंदी : संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त (Ashadhi Wari 2022) संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, खेड पंचायत समिती तालुका आरोग्य विभाग आणि नगरपरिषदेच्या वतीने आळंदी पंचक्रोशीत नागरी आरोग्य सेवा तैनात असल्याचे आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर मंहकाळे यांनी सांगितले.

    यासाठी वैद्यकीय सेवा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यात येत आहे. आळंदीतील भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे, डॉ.सुरेश गोरे, डॉ. मंकवी यांनी पथक तैनात केली असल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर मंहकाळे यांनी दिली.

    आळंदी पंचक्रोशीत २२ विहिरी, १ सार्वजनिक विहिर, १४९ खाजगी बोअरवेल, ९ सार्वजनिक बोअरवेल, १६ सार्वजनिक नळ आदी ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास आले आहेत. यामध्ये सर्व संबंधित ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून शुद्धीकरणासाठी तसेच सर्व जलस्त्रोतांचे ओटी टेस्ट दिवसातून दोन, तीन वेळा घेण्यात येत आहेत. दिंडी मार्गावर विविध ठिकाणी पाण्याचे टॅकरची सोय करण्यात आली.