nawab malik and anil deshmukh

राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha) या दोन्ही नेत्यांना मतदान करण्यासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता 20 जून रोजी विधान परिषद मतदान होत (20 June MLA Election) आहे. या निवडणुकीसाठी मतदान (Voting) करता यावे यासाठी या दोघांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, यांच्या याचिका अर्जावर 16 जून 2022रोजी म्हणजे उद्या सुनावणी होणार आहे.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Leaders Anil deshmukh and Nawab Malik) हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या तुंरुगात आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha) या दोन्ही नेत्यांना मतदान करण्यासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता 20 जून रोजी विधान परिषद मतदान होत (20 June MLA Election) आहे. या निवडणुकीसाठी मतदान (Voting) करता यावे यासाठी या दोघांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, यांच्या याचिका अर्जावर 16 जून 2022रोजी म्हणजे उद्या सुनावणी होणार आहे. (The petition will be hearing on June 16, 2022)

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही नेते तुरुंगात असल्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. तसेच मविआला दोन मतं गमवावी लागली होती. राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी दिली नव्हती, किमात आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे. (The petition will be hearing on June 16, 2022)

    दोघांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी करण्यात येत आहे. परंतु आजच्या कोर्टाच्या कामकाजात सुनावणी होईल असे वाटत नाही यामुळे सुनावणी उद्यावर जाणार आहे. दरम्यान आता राज्यसभेसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना परवानगी मिळणार का? याकडे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या दोघांना परवानगी मिळाल्यास मविआकडे पुन्हा दोन मतं वाढतील.