सलग दोन दिवस रात्री ८ वाजेपर्यंत उच्च न्यायालय सुरू

मुंबई उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन संध्याकाळी ४.३० वाजता संपुष्टात येते. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाचे कामकाज रात्री आठ वाजेपर्यत सुरू होते.

  मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस.एस.शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाचे कामकाज गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस रात्री आठ वाजेपर्यत सुरू होते. दोन्ही दिवस खंडपीठासमोर १९० हून अधिक प्रकरणांवर सुनावणी पार पडली. गुरुवारी न्यायालयाच्या कामकाजाची दखल घेत केंद्रींय विधी मंत्र्यांनी न्या. शिंदे यांची स्तुती केली होती.

  मुंबई उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन संध्याकाळी ४.३० वाजता संपुष्टात येते. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाचे कामकाज रात्री आठ वाजेपर्यत सुरू होते. दोन्ही दिवसात न्य़ा. शिंदे यांच्या खंडपीठाच्यासमोर १९० हून अधिक खटल्यांवर सुनावणी पार पडली.

  केंद्रीय मंत्र्यांकडून स्तुती

  गुरुवारी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी न्या. शिंदे यांच्या कामाची दखल घेतली. आणि न्या. शिंदे यांच्या चेंबरवरील नावाचे फलक असलेला फोटो ट्विट करत मुंबी न्यायालयाचे कामकाज रात्री ८ वाजेपर्यत सुरू होते पाहून हे पाहून आपण आज खूप आनंदी झालो असल्याचेही म्हटले आहे.

  न्या. काथावालांची आठवण

  याआधी २०१ रोजी साडे सतरा तास न्यायालयाचे कामकाज पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालवत न्या. काथावालांनी रचला इतिहास होता. उन्हाळी सुटीतील न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने जवळपास १३ तास सलग न्यायालयीन कामकाज केले होते.

  राजस्थानच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस

  न्यायमूर्ती न्या. संभाजी शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयातील तिसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती असून ते ऑगस्ट २०२२ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने शिफारस केली आहे