धनगर समाजाला धक्का; एसटी प्रवर्गातून आरक्षणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

सध्या राज्यभरामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजासह धनगर समाज देखील आरक्षणासाठी आग्रही आहे. धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली होती.

    मुंबई : सध्या राज्यभरामध्ये आरक्षणाचा (Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजासह धनगर समाज (Dhangar reservation) देखील आरक्षणासाठी आग्रही आहे. धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून (ST Category) आरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र धनगर समाजाला मोठा धक्का बसला आहे.

    धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी याचिका दाखल करण्यात आली होती. मागील अनेक दिवसांपासून या याचिकेवर सुनावणी पार पडत होती. राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे लक्ष निर्णयाकडे लागले होते. मात्र मुंबई हायकोर्टाने धनगर समाजाची याचिका फेटाळली आहे.

    जस्टीस पटेल आणि जस्टीस कमल खटा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. निर्णय देताना सांगण्यात आले आहे की, अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसदमंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. असं म्हणत एसटीमधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर धनगर समाजाला धक्का बसला असून याचिकाकर्ते पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.