‘कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषध घेऊन दवाखाना चालत नसतो’; मनसेच्या गजानन काळेंचा टोला नक्की कुणाला?

आजारी पडल्यावर मी डॉक्टरकडून औषधं घेत नाही. तर कंपाऊंडरकडून घेतो, असं संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं. त्याचा संदर्भ त्यांनी आताच्या राजकीय परिस्थितीशी जोडला आहे.

    मुंबई : सध्या महाराष्ट्रीतल राजकीय वातावरण तापलं असताना राजकीय वर्तुळात दररोज आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या सगळ्यात मनसे मागे राहिलं असं कसं होणार? सध्याची अस्थीर झालेली राजकीय परिस्थीती पाहता मनसे नेते गजानन काळेंनी एक ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. “कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधं देऊन दवाखाना चालत नसतो”, असं गजानन काळे यांनी म्हटलंय.

    गजानन काळेंच ‘हे’ ट्विट चर्चेत

    “वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॅाक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखता आली पाहिजे… दररोज राऊंड घेतले पाहिजे … कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो… एक ना एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच…!”, असं ट्वि त्यांनी केलं आहे. शिवाय पुढे त्यांनी अराजकीय हा हॅशटॅग वापरला आहे.

    आजारी पडल्यावर मी डॉक्टरकडून औषधं घेत नाही. तर कंपाऊंडरकडून घेतो, असं संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं. त्याचा संदर्भ त्यांनी आताच्या राजकीय परिस्थितीशी जोडला आहे. एक ना एक दिवस आमदार दुसऱ्या पक्षात जाणारच होते. ते गेले, अश्या आशयाचं ट्विट त्यांनी केलंय.