
आपल्या महाराष्ट्राचा परिवहन विभाग, ज्याचे मंत्री खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, या विभागात असलेले एसटी महामंडळ, जे वर्षानुवर्षे तोट्यात चालणारे आणि कधीही नफ्यात न येणारे मंडळ अशी ख्याती होती.
मुंबई : आपल्या महाराष्ट्राचा परिवहन विभाग, ज्याचे मंत्री खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, या विभागात असलेले एसटी महामंडळ, जे वर्षानुवर्षे तोट्यात चालणारे आणि कधीही नफ्यात न येणारे मंडळ अशी ख्याती होती. परंतु, घरात न बसता, प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले तर एखाद्या महामंडळात काय चमत्कार होऊ शकतो, हे राज्यातील शिंदे – फडणवीस – पवार सरकारने दाखवून दिले आहे.
देशामध्ये फक्त सहा राज्यांमधील एसटी महामंडळे ही फायद्यात चालली आहेत, बाकी सर्व तोट्यात सुरु आहेत, असे शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. एसटी महामंडळ हे स्वतंत्ररित्या चालणारे महामंडळ आहे. महाराष्ट्र शासनाकडून काही वेळा त्यांना आर्थिक मदत केली जाते. परंतु मागील 2-4 वर्षांत कोविड काळात व त्याच्या अगोदर व्यवस्थितरित्या लक्ष न दिल्याने हे महामंडळ तोट्यात चालले होते.
अगदी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके देखील एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीतून महामंडळाला सावरणे, ही मोठी कसरत होती. पण अशा बिकट परिस्थितीतून सरकारने चांगल्या पद्धतीने यशस्वीरीत्या बाहेर काढले, असे सामंत म्हणाले.