
पुणे/पिंपरी : आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावरती (हवेली विभाग) भव्य राष्ट्र कल्याण सामुदायिक जन आंदोलन आमरण उपोषण ह. भ. प. भगवान महाराज कोकरे दि. 1 नोव्हेंबर पासून केले होते.त्यांनी आज (दि.12)बाराव्या दिवशी वारकरी संप्रदाय, सामाजिक,राजकीय इ.मान्यवरांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन आपले उपोषण स्थगित गेले.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी सांगितले त्यांच्या मागण्याचा शासना कडे पाठपुरावा केला जाईल. उपोषण सोडावे अशी त्यांनीत्यांना विनंती केली.माजी मंत्री बाळा भेगडे यांनी शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल.त्या संदर्भात शासनाने कडे बैठक लावूनत्या संदर्भात न्याय कसा मिळेल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत. यावेळी त्यांनी सांगितले.व उपोषण सोडण्याची विनंती केली.
मिलिंद एकबोटे संपूर्ण भारत देशामध्ये समान नागरी कायदा व समान शिक्षण कायदा लागू करणे.श्री तुंगारेश्वर वसई या ठिकाणीपाडलेला बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम याविषयी मनोगत व्यक्त केले.इतर मागण्या संदर्भात त्यांनी माहिती दिली.तसेच त्यांनी हेउपोषण सोडण्याची विनंती केली.
देहू देवस्थान चे माणिक महाराज मोरे ,पुरुषोत्तम महाराज मोरे व श्याम महाराज,संतोषानंद महाराज,प्रकाश तात्या बालवडकर, संदीपमहाराज लोहर, प्रकाश महाराज, पांडुरंग शितोळे महाराज यांनी उपोषण कर्ते, त्यांच्या मागण्या याबाबत माहिती देत आपले मनोगत येथेव्यक्त व्यक्त केले.व भगवान महाराज कोकरे यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली.
भगवान महाराज कोकरे यांनी आपण उपोषण का केले व त्यासंदर्भातील माहिती दिली.तसेच त्यांनी वारकरी संप्रदाय यांना शासना तर्फेपुरस्कार का दिला जात नाही.मारुती महाराज कुरेकर यांना वारकरी संप्रदायात केलेल्या योगदाना बाबत, कार्यबाबत शासनाने पुरस्कारद्यावा यावेळी त्यांनी मागणी केली.
तसेच यावेळी बालयोगी सदानंद आश्रम बांधणीची 15 दिवसात वर्क ऑर्डर काढावी.नाहीतर हिंदुत्ववादी संघटनाना भेटून त्यासंदर्भातमार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे यावेळी त्यांनी सांगितले.पोलीसांनी उपोषण मोडण्यासाठी जी वागणूक दिली.त्या संदर्भातत्यांनी माहिती दिली.वारकरी संप्रदाय या विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,राम गावडे,शरद बुट्टे,नरहरी चौधरी महाराज,राजाभाऊ चोपदार,संजय बालवडकर,विलासबालवडकर,किरण येळवंडे,चारुदत्त प्रसादे,अजित वडगांवकर,राहुल चव्हाण संकेत वाघमारे व अनेक मान्य वर उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
1)संपूर्ण भारत देशामध्ये समान नागरी कायदा व समान शिक्षण कायदा लागू करणे.
2)जाती आधारित असलेले आरक्षण रदDद करून आर्थिक निकषांवर व गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.
3)महाराष्ट्रात शेतकऱ्यांने पिकविलेल्या शेत मालाला कायमस्वरूपी हमीभाव देण्यात यावा. असा समावेश आहे.
इतर मागण्या
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या नद्यांमधील पाणी माणसाने पिण्या इतके शुद्ध असावे.
महाराष्ट्रातील प्रमुख प्रमुख तीर्थक्षेत्रांत मांस आणि मद्यविक्री कायम स्वरूपी बंद करावी. आळंदी पंढरपूर अश्या असणाऱ्या पालखीमार्गाचे रूपांतर हे पालखी प्रकल्पात करण्यात यावे व प्रत्येक तळ्यांच्या ठिकाणी 25 एकर जागा आरक्षित करून त्या ठिकाणी वारकरीभवन बांधून, महिना वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी. श्री तुंगारेश्वर वसई या ठिकाणी शासनाने पाडलेला बालयोगी सदानंदबाबांचा आश्रम शासनाने त्वरित बांधून देण्यात द्यावा.