
मुर्तीच्या एका हातात पेन, पॅड, इलेक्ट्रॉनिक बूम, कॅमेरा देण्यात आला असून ही मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
बुलढाणा : संपूर्ण राज्यामध्ये धुमधडाक्यात गणरायाचे आगमन केले आहे आणि सर्वांचे मन उत्साहाने भरले आहे. संपूर्ण राज्यामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे आणि गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मूर्तिकारांच्या कलेने गणपती बाप्पा वेगवेगळ्या अवतारात आले आहेत. अतिशय सुंदर आणि आकर्षक गणेश मूर्ती पाहायला मिळाल्या आहेत. या वर्षीपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पत्रकार गणेश उत्सव मंडळाकडून साजरा करण्यात येत आहे.
पत्रकार भवन येथे ढोल ताशांच्या गजरात गणरायाची स्थापना करण्यात आली. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकाराच्या वेशभूषेत बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मुर्तीच्या एका हातात पेन, पॅड, इलेक्ट्रॉनिक बूम, कॅमेरा देण्यात आला असून ही मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. तर हा उत्सव पाच दिवस साजरा करण्यात येणार असून यामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेतले जाणार आहेत.
गणरायाच्या अवतीभवती सुद्धा अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. या बापाच्या रुपामुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे.