शिंदे सरकारची प्रतिमा ‘स्थगिती देणारे सरकार अशी होऊ नये’; अशोक चव्हाणांचा टोला

मुख्यमंत्री असताना जेवढी कामे कदाचित झाली नसतील, तेवढी कामे अथवा त्याच्यापेक्षाही जास्त कामे, या माझ्या या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात करता आली. त्यामुळे मी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानतो, असे माजी मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

    मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने (Shinde Government) मागील महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) कामांवर ‘डीपीडीसी’च्या (DPDC) माध्यमातून घेतलेल्या निर्णयावर स्थगिती (Stay On Decision) आणली. हे सरकार येताच राज्यशासनात जे निर्णय घेतले जात आहेत, त्यात राज्यातील विकासात्मक कामांना स्थगिती देण्याचा आरंभ झाला आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे ‘स्थगिती (Postponment Government) देणारे सरकार अशी त्यांची प्रतिमा होऊ नये’, अशी माझी अपेक्षा आहे असे माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

    मुख्यमंत्री असताना जेवढी कामे कदाचित झाली नसतील, तेवढी कामे अथवा त्याच्यापेक्षाही जास्त कामे, या माझ्या या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात करता आली. त्यामुळे मी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

    विधान परिषद निवडणूक प्रसंगी ज्या काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केले त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तर, चंद्रकांत हंडोरे यांची सात मते फुटली हे जाणून बुजून झाले की कसे हे माहीत नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही चव्हाणांनी केली.

    संभाजी महाराज नामकरणाची सर्वत्र मागणी
    औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरावरून (Sambhaji Maharaj Naming) बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मागचा इतिहास जर पहिला तर ज्या पद्धतीने औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली होती हा इतिहास आहे. त्यामुळे जनसामान्य माणसामध्ये संभाजी महाराजांविषयी खूप मोठी आस्था आहे, त्यावरून त्यांचे नाव द्यावे ही मागणी सर्वत्र होती, त्यामुळे हे नामकरण झाले असावे असे ते म्हणाले.