मांडवा येथे स्पीड बोटीने घेतला पेट, दोन जण जखमी

आगीत बोटी मधील दोघे जण जखमी झाले असून त्याचा या दोघांना तातडीने वाचवत रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    अलिबाग : मांडवा येथे भरसमुद्रात एका खाजगी स्पीड बोटीने पेट घेतल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. मांडवा जेरी जवळ समुद्रात एका स्पीड बोटीने अचानक पेट घेतला. या आगीत बोटी मधील दोघे जण जखमी झाले असून त्याचा या दोघांना तातडीने वाचवत रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    एका बोटीच्या साहाय्याने सदर आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली. सदर आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही.