The incident took place at Shirpur police station in Chakba Scorpio, Ekamba

ही स्कॉर्पिओ औरंगाबाद येथून एकांबा येथे आली असता, वाहनचालक अनिल जाधव लघुशंकेकरिता उतरले होते. एवढ्यातच संधी साधून चोरटे गाडी चोरून तेथून पसार झाले. या प्रकरणी शिरपूर पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवित असून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

    शिरपूर : चोरट्यांनी चक्क स्कॉर्पिओ जीप पळविल्याची घटना येथून जवळच असलेल्या एकांबा येथे ७ मे रोजी रात्री १२.३० वाजतच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी शिरपूर पोलिसांना आव्हानच दिले असून, या प्रकरणी स्कार्पिओ चालकाने ७ मे रोजी रात्रीला शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

    घटनेबाबत शिरपूर पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जीपचालक अनिल जाधव यांची एम. एच. ०५ ए. एस. ७३२९ या क्रमांकाची स्कॉर्पिओ भाड्यांनी घेतली. अडीच लाख रुपये किंमत असलेली ही स्कॉर्पिओ औरंगाबाद येथून एकांबा येथे आले असता, वाहनचालक अनिल जाधव लघुशंकेकरिता उतरले होते. एवढ्यातच संधी साधून चोरटे गाडी चोरून तेथून पसार झाले.

    घटनेची माहिती मिळताच तातडीने शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे, पीएसआय शरद साठे, सपोनि जगदीश बांगर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी शिरपूर पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवित असून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. वाहनचालक अनिल उत्तम जाधव रा. पांगरा ता. कंधार जि. नांदेड ह. मु. वाळूज ता. जि. औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीहून शिरपूर पोलसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि जगदीश बांगर करीत आहेत.