जावळी बँकेच्या निवडणुकीचा नगरा वाजला ; 23 जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान

आमदार शशिकांत शिंदे गट व मानकुमरे गट निवडणुकीच्या  लागले तयारीला

    पाचगणी  : जावली तालुक्याची एकमेव अर्थवाहिनी असणाऱ्या दत्तात्रय  महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉक्टर पी. एल. खंडागळे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. या बँकेची निवडणूक २३ जुलै रोजी होत असून आता भर पावसात निवडणुकीसाठी धुमशान होणार आहे. नेत्यांनी आगोदरच रणशिंग फुंकले असल्याने आता खरी लगबग सुरू होणार आहे.
    जावली नव्हे तर सातारा जील्ह्याबरोबरच महाराष्ट्रची अर्थवहिनी असणाऱ्या दत्तात्रय  महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी २० जून ते २४ जून दरम्यान 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची आहेत. नामनिर्देशन पत्रे जसजशी प्राप्त होतील तसतशी त्याची सूची प्रसिद्ध करण्यात येईल. २७ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून २८ जून ते १२ जुलै दरम्यान अर्ज माघारी घेण्याची दीर्घ मुदत आहे. तर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराना १३ जुलै रोजी चिन्ह वाटप होईल व अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तर २३ जुलै रोजी मतदान होणार आहे अशी माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई फोर्ट मुंबई यांनी दिली आहे .
    जावळी सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता ऐकून १७ जागा निवडण्यात येणार असून यामध्ये सर्वसाधारण १२, महिला प्रतिनिधी २, अनु.जाती जमाती प्रतिनिधी १, इतर मागास प्रतिनिधी १,भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी १ जागा अशी विभागणी करण्यात आली आहे.
    सध्या बँकेची सूत्रे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या हातात असून त्यांनी आगोदर पासूनच कंबर कसली आहे. जावली तालुक्यातील  राजकारणात सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ. शशिकांत शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला असून. वसंतराव मनकुमरे यांनी बिनविरोध साठी धूम ठोकली असली तरी आता आ. शिंदे यांचेबरोबर अमितदादा कदम, योगेश गोळे , माजी आ. सदाभाऊ सपकाळ हे उभे आहेत. त्यामुळे आ. भोसले, वसंतराव मानकुमरे आणि त्यांची विद्यमान संचालक टीम यांच्यात आणि विरोधी गटात काय चर्चा आणि गोळाबेरीज होते यावर निवडणुकीचे गणित ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी आता भर पावसात जावली बँकेचे रण तापणार हे निश्चित आहे.