महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला; यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय म्हणायचे काय?, मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन सामनातून बोचरी टिका

येणाऱ्यांच्या गाडय़ा-घोडय़ांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कलिना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका प्रमुख वास्तूंवर असे हातोडे घातले जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो!

    मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत येत आहेत. परंतु भाजप (BJP) सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) मुंबईकरांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील भव्यदिव्य कार्यक्रम होत असताना राज्याची व मुंबईची या सरकारने काय दशा करुन ठेवली, यावरुन आज सामनातून बोचरी टिका करण्यात आलेली आहे.

    दरम्यान, काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळय़ा भाजप वाजवणार. पंतप्रधान येतील व मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर केले. मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून हा कायापालट केंद्राने सुरूच केला आहे. महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

    पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी गर्दी करण्याचे नियोजन आहे व येणाऱ्यांच्या गाडय़ा-घोडय़ांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कलिना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका प्रमुख वास्तूंवर असे हातोडे घातले जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो! आहेच!! अशी बोचरी टिका आज सामनातून करण्यात आलेली आहे.

    तसेच जी कामे शिवसेनेच्या काळात किंवा महाविकास आघाडीच्या काळात झाली, त्या कामांचे भूमिपूजन हे खोके सरकार करत आहे, आणि कामाचे श्रेय घेत आहे, दरम्यान, मोदी मुंबईत येणार म्हणून मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. वाहतूक कोंडी, सुरक्षा आदीमुळं आज मुंबईकरांना त्रास होणारेय. या कार्यक्रमासाठी बाळासाहेबांपेक्षा मोदी व अन्य नेत्यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत, यावर मिंधे सरकारमधील नेते शांत बसले आहेत, अशी सामनातून बोचरी टिका करण्यात आलेली आहे.