पंतप्रधान मोदी, शिंदे व फडणवीस यांची एकाच सीटवरुन मेट्रोची सफर;  “संभाषणाचा अंदाज लावा” असं फडणवीस यांच्याकडून सूचक ट्विट, रोख नेमका कोणाकडे?

मेट्रोच्या एकाच डब्ब्यात एकाच सीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रोतून प्रवास केला. यावेळी आमच्यात कोणत्या प्रकराचा संवाद झाला असेल, याचा अंदाज लावा, अशा प्रकारचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

    मुंबई- काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत आले आहेत. दरम्यान, हा कार्यक्रम मोठ्याने तसेच भव्य दिव्य असा साजरा करण्यात आला. दरम्यान, सर्व विकासकामांचे मोदींनी लोकार्पण व भूमिपूजन केल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत, विविध मुद्दांवर भाष्य केले. त्यानतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला.

    दरम्यान, मेट्रोच्या एकाच डब्ब्यात एकाच सीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रोतून प्रवास केला. यावेळी आमच्यात कोणत्या प्रकराचा संवाद झाला असेल, याचा अंदाज लावा, अशा प्रकारचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांचा एकाच सीटवर मेट्रोतून प्रवास करतानाचा फोटो आहे, आणि कॅप्शन इंग्रजीत लिहिले आहे की, “Guess the conversation..” असं म्हटलं.

    या ट्विटनंतर चर्चांन उधाण आलं असून, देवेंद्र फडणवीस यांचा नेमका रोख कुणाकडे असेल? अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच आमच्या तिघांमध्ये कोणता संवाद होत आहे, याच तुम्ही अंदाज लावू शकाल का? असं फडणवीसांनी म्हणत कोणाला संकेत दिले आहे, कोणाला सूचक इशारा दिलाय का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.