विरार-पालघर वासियांचा प्रवास आणखीनच सुखकर!

सफाळे जेठीचे काम झाल्यावर ही वाहतुक सुरु होणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे महापालिकेतील माजी सभापती अजीव पाटील यांनी दिली.

    वसई : वसई-भाईंदर रोरो सेवे पाठोपाठ आता लवकरच विरार-पालघर जलवाहतुक सुरु होणार आहे. सफाळे जेठीचे काम झाल्यावर ही वाहतुक सुरु होणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे महापालिकेतील माजी सभापती अजीव पाटील यांनी दिली.

    वसई किल्ला ते भाईंदर अशी रोरो सेवा सुरु झाल्यामुळे हजारो नागरिकांना भाईंदरच्या आसपासच्या शहरात जाऊन आपापली कामे आपल्या वाहनांसह ये-जा करता येत आहे. त्यामुळे त्यांचा श्रम, पैसा आणि इंधानाचीही बचत होत आहे. त्याचप्रमाणे रेल्वे लोकलचा जीवघेणा प्रवास ही त्यांना टाळता येऊ लागला आहे. या सेवे पाठोपाठ विरार-सफाळे-पालघर अशी जल वाहतुक सुरु होणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे महापालिकेतील माजी सभापती अजीव पाटील यांनी दिली आहे.

    विरार किनाऱ्यावरील जेठीचे काम झाले असून, डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर आता सफाळे किनाऱ्यावरील जेठीचे काम करण्यात येत असून, हे काम पूर्ण झाल्यावर वसई-विरारमधील प्रवाशांना लोकलचा प्रवास टाळून समुद्रामार्गे जाता येणार आहे. त्याप्रमाणे नारंगी-दातिवरी येथील कामेही सुरु असून, या जलवाहुतूकीद्वारे दुचाकी, चारचाकी बोटीतून नेता-आणता येतील. त्यामुळे दळणवळण सुरक्षीतपणे करता येईल. त्याचा भाजीपाला विक्रेते, शेतकरी, कामगार, विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांचा जलवाहतूकीमुळे वेळ, श्रम वाचणार आहेत.

    वसई-विरारमधील हजारो नागरिक पालघरला कामासाठी तर पालघरमधील विद्यार्थी शिक्षणासाठी विरारमध्ये येत असतात. या जलवाहतुकीमुळे त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. येत्या वर्षभरात ही वाहतुक सुरु होईल अशी माहिती अजीव पाटील यांनी दिली.