केडीएमसी आयुक्तांनी घेतला सर्वकष स्वच्छता मोहीमेचा प्रत्यक्ष आढावा

काटई नाका ते पत्रीपुल या मार्गावर दुतर्फा करण्यात आलेली खुदाई व पदपथावरील यावरील डेब्रिज उचलणे बाबत संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.

    कल्याण : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता मोहीम कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नियमित स्वरुपात राबविण्यात येत आहे. या शहर स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी काल कल्याण शिळ रस्ता, काटई नाका ते दुर्गाडी पुलापर्यंत रस्त्याची पाहणी केली.

    कल्याण काटई नाका येथील ट्रॅफिक नियंत्रण अनुषंगाने चौकाचे विस्तारीकरण तसेच चौकाचे नियोजन करुन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले. काटई नाका ते पत्रीपुल या मार्गावर दुतर्फा करण्यात आलेली खुदाई व पदपथावरील यावरील डेब्रिज उचलणे बाबत संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. पत्रीपुल ते दुर्गाडी किल्ला गोविंदवाडी बायपास रस्त्यामधील पुलाचे गर्डर तसेच लेबर शेड हटविणेबाबत एमएसआरडीसी विभागास निर्देश दिले असून, गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील कचरा तसेच डेब्रिज उचलण्याबाबत आणि संबंधीत तबेलेधारकासही सुचना देण्यात आल्या.

    गोविंदवाडी-दुर्गाडी चौकात होणाऱ्या ट्रॅफीक नियोजन अनुषंगाने भटाळे तलाव येथील विकास योजनेतील रस्त्यातील अतिक्रमणे हटविणेबाबत संयुक्त मोहीम हाती घेण्याबाबत सुचना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.