Another accused in Feroz Khan murder case also stabbed to death in Gajaad

आईच्या चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या मुलानेच हे हत्याकांड केले असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. आरोपी मुलाला धुळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

    धुळे: तीन दिवसांपूर्वी झालेल्या हत्याकांडाने धुळे हादरले होते. आई आणि मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या त्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. १९ वर्षीय मुलाने आईची व आजीची डोक्यात लोखंडी रॉड टाकून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

    तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील तरवाडे गावात दुहेरी हत्याकांडने धुळे जिल्हा हादरला होता. त्या हत्येवरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आईच्या चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या मुलानेच हे हत्याकांड केले असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. आरोपी मुलाला धुळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोटच्या मुलाने आई व आजीचा निर्घृणपणे खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे, धुळे तालुक्यातील तरवाडे या गावात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या चंद्रभागाबाई माळी (वय वर्ष ६५) व त्यांची मुलगी वंदना महाले (वय वर्ष ४५) यांचा पहाटेच्या दरम्यान रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

    या संदर्भात तालुका पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात अली, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली होती. अधिक माहितीनुसार, मुलगी वंदना तिचे वैवाहिक वाद सुरू असल्यामुळे त्या आईकडेच राहत होत्या. यादरम्यान अशा पद्धतीने या दोघा मायलेकींचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर या खुणा संदर्भात तर्कवितर्क लावले जात होते.”