नराधमांनी महिलेला दारू पाजून केला बलात्कार, ठोठावली १० वर्षांची शिक्षा

अलिबागमधील निर्घृण घटना, महिलेवर केले आळीपाळीने अत्याचार, दोघा आरोपीना अटक

    अलिबाग : महिलेला दारू पाजून तिच्‍यावर आळीपाळीने बालात्‍कार केल्‍या प्रकरणी दोघा आरोपींना अलिबाग येथील जिल्‍हा न्‍यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी प्रत्‍येकी 10 वर्ष कैद आणि 15 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेश लहानु नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे अशी आरोपींची नावे आहेत.

    या खटल्‍याची सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील तळाशेत गावच्‍या हद्दीत वडवली रोडवर, नेटको कंपनीच्या टेकडीवर रविवार १९ डिसेंबर २०२० रोजी रात्री सव्‍वादहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुरेश लहानु नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे यांनी पिडीत महिला ही तिच्या मुलीकडे तळाशेत वाडीवर गेली असता, ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिला पाठीमागून पकडून झाडी झुडपात खेचत नेले. तिला जबरदस्तीने दारु पाजून दोघांनी तिचे कपडे कडून तिच्यावर आळीपाळीने बलात्‍कार केला. या पिडीत महिलेचे नातेवाईक तिचा शोध घेण्यास तळाशेत वाडीवर गेला असता तिचा आवाज ऐकूण फिर्यादी हे त्या दिशेने गेले. त्‍यावेळी आरोपी हे पिडीत महिलेवर अत्याचार करीत असताना तिच्यावर ओरडली आणि त्यांचे फोटो काढले असता आरोपींनी त्‍यांच्‍यावर दगडफेक केली.

    त्यानुसार पोयनाड पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर भा. द. वि. सं. कलम ३७६ (ड), ३३६, ३२८ सह ३४ व अ.जा.अ.ज. अत्याप्रतिबंधक कायदा कलम ३(१) (डब्ल्यु) (आय) अन्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपींविरोधात न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्‍यात आले. न्यायालयाने गुन्हयात दोषी पकडून दोन्ही आरोपीना 10 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 10 हजार रूपये दंड ठोठावला आहे. तसेच भा. द. वि. सं. कलम ३२८ नुसार न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी पकडून 2 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

    अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली तु. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जलद गतीने तपास पूर्ण करून मोलाची सहकार्य केले. या खटल्यात विशेष शासकिय अभियोक्ता स्मिता धुमाळ-पाटील यांनी एकूण 15 साक्षीदार तपासून युक्तीवाद केला. त्यामध्ये फिर्यादी, पीडीत साक्षीदार, सहायक रासायनिक विश्लेषक, नायब तहसिलदार अलिबाग, वैद्यकिय अधिकारी आणि प्राथमिक तपासिक अंमलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच पोलीस हवालदार सचिन खैरनार, पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई प्रियांका सायगावकर, यांचे सहकार्य मोलाचे ठरले.