पूर्व वैमनस्यातून रेती व्यावसायिकाची हत्या; अंधाधुंद गोळीबार केला अन्…

रेतीघाट बंद असूनही रेतीची विक्री जोमात सुरू आहे. कमी वेळात जास्त पैसा कमविण्यासाठी या व्यवसायात अनेकांनी पाय रोवले. त्यातून आता स्पर्धा निर्माण झाली आहे. अशाच रेती व्यावसायिकावर स्पर्धेतून आणि जुन्या वैमनस्यातून रेती व्यावसायिक तिरोडा मार्गाने दुचाकीने गोंदियाकडे येत असताना सोमवारी (दि. 22) रात्री 10 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी अंदाधुंद गोळीबार केला.

    गोंदिया : रेतीघाट बंद असूनही रेतीची विक्री जोमात सुरू आहे. कमी वेळात जास्त पैसा कमविण्यासाठी या व्यवसायात अनेकांनी पाय रोवले. त्यातून आता स्पर्धा निर्माण झाली आहे. अशाच रेती व्यावसायिकावर स्पर्धेतून आणि जुन्या वैमनस्यातून रेती व्यावसायिक तिरोडा मार्गाने दुचाकीने गोंदियाकडे येत असताना सोमवारी (दि. 22) रात्री 10 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी अंदाधुंद गोळीबार केला. यात गोळी लागून व्यावसायिक रोहित हरिप्रसाद तिवारी (वय 36) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोमवारी रात्री गोंदियात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    गेल्या काही वर्षांपासून गोंदिया शहर गुंडांच्या दहशतीखाली आहे. शहरात अनेक गँग सक्रिय आहेत. मात्र, पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही वर्षांत रेती विक्रीचा व्यवसाय कमी श्रम आणि कमी वेळात रग्गड पैसा कमविण्याचे साधन झाले आहे. अनेक जण या व्यवसायात उतरले. त्यांनी रग्गड पैसादेखील कमावला आहे. यातूनच गट निर्माण होऊन व्यावसायिक स्पर्धा तयार झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या पाच ते सात वर्षांत सहा ते सात जणांची हत्या करण्यात आली.

    उल्लेखनीय म्हणजे पूर्वी मारहाण करून सोडले जात होते. आता थेट तलवार आणि बंदुकीतून गोळीबार करून संपविण्याचेच काम होत आहे. अशाच एका व्यावसायिक स्पर्धेतून रिंग रोड स्थित हनुमाननगरातील रहिवासी गोलू ऊर्फ रोहित हरिप्रसाद तिवारी (वय 36) यांची सोमवारी (दि. 22) रात्री 10 वाजताच्या सुमारास गोळी घालून हत्या करण्यात आली.

    गोलू तिवारीचे कुबेर ट्रेडर्स नावाचे रेती, गिट्टी आदी सप्लायर्सचे फर्म आहे. गोलू तिवारी सोमवारी रात्री दुचाकी (एमएच 35, एव्ही 7979)ने तिरोडा येथून गोंदियाकडे येत होते. दरम्यान, त्यांच्या पाठीमागे एका दुचाकीवर दोन जणांनी त्यांचा पाठलाग करून गोळीबार केला. तिवारींची दुचाकी स्लीप झाली. दुचाकी स्लीप झाल्याने ते गंभीर जखमी झाले.