संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल, चांगला भाव मिळाला नाही म्हणून अख्खी बागच केली उद्ध्वस्त

महिनाभरापूर्वी चांदूरबाजार व धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हजारो संत्रा झाडांवर जेसीपी फिरवून तोडून टाकला. यानंतर आता अचलपूर तालुक्यातील नितीन डकरे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सुमारे हजार झाडांवर जेसीपी चालून संत्रा बाग उध्वस्त केली आहे.

    अमरावती (Amravati) : जगभरात नागपुरी संत्रा म्हणून प्रसिद्ध असलेला अमरावती जिल्ह्यातील संत्रा धोक्यात आला आहे. वातावरणातील बदल निसर्गाचा लहरीपणा व शासनाचे कुचकामी धोरण यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्रा बागा उध्वस्त करताना दिसत आहे.

    महिनाभरापूर्वी चांदूरबाजार व धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हजारो संत्रा झाडांवर जेसीपी फिरवून तोडून टाकला. यानंतर आता अचलपूर तालुक्यातील नितीन डकरे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सुमारे हजार झाडांवर जेसीपी चालून संत्रा बाग उध्वस्त केली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत संत्र्याला भाव मिळत नसल्यामुळे निराश देऊन हे पाऊल उचलावे लागत असल्याचे म्हणणे शेतकऱ्याचे आहे.

    नितीन ठाकरे यांचा मुख्य व्यवसाय शेती असून ते मागील पंधरा वर्षापासून संत्र्याची शेती करत आहेत. मात्र, मागील तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शासकीय धोरणामुळे संत्रा शेती परवडत नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुर्दैवाने संत्रा बागा उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे. यावर शासनाने तात्काळ उपायोजना न केल्यास संत्रा शेती उध्वस्त होण्याची शक्यता आहे.