
काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय काल (दि. २९) जनशताब्दी एक्सप्रेसच्या शेकडो प्रवाशांना मनमाड रेल्वे स्थानकावर आला. जालन्याहून मुंबईकडे गाडी जात असताना एका डब्याची कपलिंग बेरिंग तुटली होती. गाडी सुरु झाल्यावर कपलिंग तुटून अर्धी गाडी पुढे निघून होती.
मनमाड : काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय काल (दि. २९) जनशताब्दी एक्सप्रेसच्या शेकडो प्रवाशांना मनमाड रेल्वे स्थानकावर आला. जालन्याहून मुंबईकडे गाडी जात असताना एका डब्याची कपलिंग बेरिंग तुटली होती. गाडी सुरु झाल्यावर कपलिंग तुटून अर्धी गाडी पुढे निघून होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर गाडी थांबाविण्यात आली आणि कपलिंग तुटलेला डबा काढून त्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे दोन तास गाडीचा खोळंबा झाला होता त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी धावत असताना जर कपलिंग तुटली असती तर मोठी दुर्घटना झाली असती मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला.
याबाबत रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार १२०७२ अप जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान मनमाड रेल्वे स्थानकाच्या प्लॉट फार्म क्र. ५ वर आली. सुमारे १० मिनिटानंतर गाडी मुंबईकडे जाण्यास निघाली हाेती. मधोमध असलेल्या डी-११ या आरक्षित डब्याची कपलिंग बेयारिंग तुटली. त्यामुळे काही पुढचे डबे घेऊन गाडी काही अंतरावर गेली; मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर गाडी थांबाविण्यात आली आणि कपलिंग तुटलेला डबा काढून त्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. ाडी धावत असताना जर कपलिंग तुटली असती तर मोठी दुर्घटना झाली असती मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला असल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.