The mayor of Cellu has asked the chief minister for funds for all-round development

विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

    सेलू : येथील नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासात्मक दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

    मुंबईच्या बिकेसी मैदानावर नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसंपर्क अभियानांतर्गत सभा पार पडली. या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, बाळा शहागडकर यांच्या समवेत नगराध्यक्ष स्नेहल देवतारे उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना सेलू शहराच्या सर्वांगीण विकासात्मक दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन दिले.