घाटकोपर येथील मृत मुलीच्या कुटुंबियांची महापौरांनी घेतली भेट

पंधरा वर्षीय आर्या नावाच्या मुलीचा कोविड लसीकरणानंतर (Covid Vaccination) मृत्यू झाल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरले आहे. मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

    मुंबई : घाटकोपर (Ghatkopar) येथील पंधरा वर्षीय मुलीचा (Girl) लसीकरणाने मृत्यू (Dead By Vaccination) झाल्याचे आरोप करणारे वृत्त व छायाचित्र समाज माध्यमांमध्ये पसरल्यानंतर, त्याबाबतची वस्तुस्थिती आणि सत्यता जाणून घेण्यासाठी तसेच मृत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज घाटकोपर येथे जाऊन त्या कुटुंबीयांच्या घरी भेट दिली.

    पंधरा वर्षीय आर्या नावाच्या मुलीचा कोविड लसीकरणानंतर (Covid Vaccination) मृत्यू झाल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरले आहे. मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

    याप्रसंगी आमदार दिलीप लांडे, नगरसेवक किरण लांडगे, एस विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) महादेव शिंदे आदी उपस्थित होते.

    महापौर पेडणेकर यावेळी म्हणाल्या की, आर्या हिच्या आजोबांनी सांगितले की, लसीकरणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झालेला नाही. अभ्यासाचा तिने अतिताण घेतल्याने ते असह्य होऊन, हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू ओढवला आहे. ह्या दुःखद प्रसंगी कोणीही यामध्ये राजकारण आणता कामा नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.