
कल्याण : डोंंबिवली ठाण्याला जोडणारा मोठा गाव माणकोली खाडी पूलावर आत्ता राजकारण चांगलेच तापले आहे. काही दिवसापूर्वी एमएमआरडीएच्या अधिकारी आणि शिंदे गटातील नेत्यांनी या पूलाची पाहणी केली होती. मात्र मनसे आमदार राजू पाटील यानी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या पूलाला येऊन मिळणाऱ्या रिंग रोडच्या आरेखनात तिथे लागूनच असलेल्या एका बांधकाम प्रकल्पासाठी बदल करावा लागत आहे. इतकेच नाही तर या नियोजन शून्य कारभारामुळे व निडणूकींच्या राजकारणामुळे सामान्यांन मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.
डोंबिवलीत मोठा गाव माणकाेली खाडी पूलाचे काम सुरु आहे. हा पूल वाहतूकीसाठी मे २०२२ मध्ये सुरु होणार असे शिवसेना नेत्यांनी सांगितले होते. हा पूल अद्याप वाहतूकीसाठी खुला झाला नाही. हा पूलाचे काम ८४ टक्के तर कधी ८९ टक्के पूर्ण झाल्याचे सांगत आहे. आत्ता हा पूल ९९ टक्के तयार झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या पूलाच्या कामाच्या दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. डोंबिवली मोठा गाव माणकोली पूल बनून तयार आहे. परंतू दोन्हीकडे जोडरस्ते तयार झालेले नाही. मात्र असेअसले तरी दुचाकी वाहने या पूलावर सर्रासपणे ये जा करीत होती. काही दिवसापूर्वी मंत्र्यांनी या पूलावर चार चाकीने प्रवास केल्याचीही चर्चा सुरु होती. आत्ता या पूलाला येऊन मिळणाऱ््या रिंग रोडच्या आरेखनात तिथे लागून असलेल्या बांधकाम प्रकल्पासाठी बदल करावा लागत आहेत. एकंदरीत या सर्व नियोजन कारभारामुळे व निवडणूकीच्या राजकारणामुळे सामान्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत राजू पाटील यांनी वारंवार हल्ला बोल केला आहे. आत्ता राजू पाटील यांच्या ट्वीट नंतर शिंदे गट आणि प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.