कोल्हापूर विमानतळावर बहुप्रतिक्षित नाईट लॅँडिंगची सुविधा सुरू

विमानावर विमानांसाठी नाइट लँडिंग सुुरू करण्यात आल्याने त्याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्याला होईल. येत्या काळात कोल्हापुरात मोठमोठे उद्योगधंदे येण्यास आणखी मदत होईल. तसेच पर्यटन वाढीसाठी नाइट लँडिंग सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.

    कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिग सुविधा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर या मागणीला यश आलं असून कालपासून या सुविधेचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी रात्री मंत्री उदय सामंत यांच्या खासगी विमानाने सुरक्षित टेक ऑफ केल्याने ही सुविधा सुरु झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

    कोल्हापूर विमानतळावर विमानांची नाइट लँडिंग सेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत होती. ही सेवा अखेर सुरू  करण्यात आली आहे. रविवारी रात्री उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाईट लँडिंग सुविधेचा लाभ घेतला.  सामंत याचं खासगी विमान कोल्हापूरहुन तिरुपतीच्या दिशेनं आकाशात झेपावलं. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी विमानतळावरून तिरुपतीकडे विमानाचे उड्डाण घेत या सेवेचा शुभारंभ केला आहे.

    नाइट लँडिंग सुविधेचा होणार लाभ

    विमानावर विमानांसाठी नाइट लँडिंग सुुरू करण्यात आल्याने त्याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्याला होईल.  येत्या काळात कोल्हापुरात मोठमोठे उद्योगधंदे येण्यास आणखी मदत होईल. तसेच पर्यटन वाढीसाठी नाइट लँडिंग सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. कोल्हापूरच्या विकासाच्या दूरदृष्टीने छत्रपती राजाराम महाराजांनी ५ जानेवारी १९३९ ला हे विमानतळ बांधले. मात्र, नियमित विमानसेवा सुरू होण्यास तब्बल ७९ वर्षे लागले. अखेर ही सेवा सुरू झाल्याने कोल्हापूरकर समाधान व्यक्त करत आहेत.