मराठी पाट्या न लावणा-यांवर पालिका करणार कारवाई

    वसई : मराठीत पाट्या न लावणा-यां व्यापा-यांवर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त आनिलकुमार पवार यांनी जाहीर केले आहे.

    सर्व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच मराठी एकीकरण समितीने ही मराठी पाट्यांचा आग्रह धरला होता. सर्व व्यापा-यांना मराठी पाट्या लावण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी ही एकीकरण समितीने केली होती. या अनुषंगाने महापालिकेने आदेश ही जाहीर केले होते. तरिही अनेक व्यापा-यांनी, दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनावरील पाट्या इंग्रजीत च ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्तांच्या देखरेखेखाली एका पथकाची स्थापना केली आहे. ही पथके इंग्रजीत पाट्या असणा-या दुकानदारांना सुरवातीला नोटीसा बजावण्यात येणार आहेत. तरिही त्यांनी मराठी पाट्या लावल्या नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

    या व्यापा-यांनी आपल्या आस्थापनाची नावे मराठीत मोठ्या अक्षरात आणि त्यापेक्षा लहान अक्षरात इतर भाषेत लिहायची आहेत. तशा नोटीसा बजावण्यास सुरवात करण्यात आली आहे. -अनिलकुमार पवार, पालिका आयुक्त