जुन्या वादातून तरुणाचा खून; भररस्त्यात त्यांनी तरुणाला गाठला अन्…

भंडाऱ्यात हत्यासत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा हत्येची घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून एका महाविद्यालयीन तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक कटकवार असे मयत तरुणाचे नाव आहे.

    भंडारा : भंडाऱ्यात हत्यासत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा हत्येची घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून एका महाविद्यालयीन तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक कटकवार असे मयत तरुणाचे नाव आहे. भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे अभिषेकची जुन्या वादातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तलवारीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

    हत्येचं कारण काय? 

    आठ दिवसांपूर्वी अभिषेकचे काही तरुणांसोबत सामान्य रुग्णालय परिसरात भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी अभिषेकला आरोपींनी गणेशपूर येथे बोलावून घेतले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृतक अभिषेक कटकवार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील टप्पा मोहल्यात वास्तव करत होता.