अकोल्यात ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या, शहरात एकच खळबळ

काल सायंकाळच्या सुमारास विशाल रमेश कपले काही कामानिमित्त या परिसरात आले असता त्यांच्यावर दोन अज्ञातांनी चाकू हल्ला केला.

    अकोला : अकोल्यातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले (Vishal Kapale Murder) यांची अज्ञाताकडुन चाकुने भोसकून हत्या करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    शहरातील जठारपेठ भागात असलेल्या गणेश स्वीट मार्ट परिसरात हे हत्याकांड घडलं आहे. काल सायंकाळच्या सुमारास विशाल रमेश कपले काही कामानिमित्त या परिसरात आले असता त्यांच्यावर दोन अज्ञातांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी नागरिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येची बातमी कळताच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णलयात हजेरी लावली.

    विशाल याची गांजा कारवाईतून हत्या झाल्याची संशय व्यक्त करण्यात येत आहे, मागील काही दिवसात त्यांनी काही लोकांना गांजा तस्करी करताना पकडून दिले होते. त्यामुळे या कारवाईचा राग मनात धरत त्यांची हत्या झाल्याचं बोलल्या जातं आहे. तरीही अद्याप हत्येचं मूळ कारण समोर आलं नसुन पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.