Murdered by stones on the head in Bibwewadi, Pune; Removed thorn for talking bad about niece

  पुणे : खडकीतील मुळा नदीपात्रात झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दारू पिताना झालेला वाद तसेच अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे समोर आहे. दरम्यान, अवघ्या काही तासांत पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे.

  खडकी पोलीस ठाण्यात तक्रार

  याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. सुधीर साहेबराव जाधव (वय ३२, रा. विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत विजय राजू धोत्रे (वय ३३, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई शशांक खाडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

  नदीपात्रात सापडला मृतदेह

  खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात जलपर्णी आहे. नदीपात्रात एकाचा मृतदेह पडला असून, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले होते. अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

  डोक्यात दगड व चाकूने गळा चिरून खून

  दरम्यान, घटनेनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट दिली. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर आणि पथकाने तपास सुरू केला होता. डोक्यात दगड व चाकूने गळा चिरून खून केल्याचे उघड झाले होते.

  पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले

  पोलिसांनी पाहणी केली असता घटनास्थळी एक चिठ्ठी आढळली होती. तसेच मृतदेहाच्या अंगावरील कपड्यावरून शोध सुरू केला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यातून मयत वाहनचालक म्हणून काम करत अल्याचे समोर आले होते. तसेच, तो विश्रांतवाडीत राहण्यास असल्याचे समजले. लागलीच पोलिसांनी शोध घेऊन नातेवाईकांना बोलावले व त्यांनी पाहणी केली असता त्याचे नाव निष्पन्न झाले.

  अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

  दारू पिताना झालेला वाद, तसेच अनैतिक संबंधाच्या संशयातून आणि जुन्या वादातून धोत्रेचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी सुधीर जाधव याला अटक केली आहे. तर त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस निरीक्षक दिघावकर यांनी सांगितले.