the names of 70 villages in the district were changed Powaritola was changed to Shivajinagar by changing the tribal names

जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ११ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ गावाचे तर उर्वरित सहा तालुक्यातील ५८ वस्त्यांची नावे जातिवाचक होती. राज्यातील अजूनही अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावांना आणि वस्त्यांना, रस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे ही नावे बदलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

    गोंदिया : गाव, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याच धर्तीवर समाज कल्याण विभागाने (Department of Social Welfare) याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्ह्यातील १२ गावे आणि ५८ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली (Caste names changed) आहे. त्यामुळे पोवारीटोला वस्ती आता शिवाजीनगर म्हणून ओळखली जाणार आहे.

    जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील (Tiroda Taluka) ११ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील (Arjuni Morgaon Taluka) १ गावाचे तर उर्वरित सहा तालुक्यातील ५८ वस्त्यांची नावे जातिवाचक होती. राज्यातील अजूनही अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावांना आणि वस्त्यांना, रस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे ही नावे बदलविण्याचा निर्णय राज्य शासनाने (State Govt) घेतला होता. या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभागातर्फे (Department of Social Justice and Special Assistance) ११ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय जारी केला होता.

    यानंतर गोंदिया जिल्ह्यात याची पंचायत समिती (Panchayat Committee) आणि नगर परिषदेच्या (City council) माध्यमातून अंमलबजावणी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील १२ गावे आणि वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यात आली आहे. या गावे आणि वस्त्यांना बुद्धनगर, दत्तात्रयनगर, जंबुदीप नगर, संत रविदास, आदर्श नगर, जोतिबानगर, एकलव्य नगर अशी नावे देण्यात आली आहे. समाज कल्याण विभागांतर्गत उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली. वस्त्या आणि गावांची जातिवाचक नावे बदलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात गोंदिया जिल्हा अग्रेसर राहिला आहे.

    महापुरूषांची दिली नावे

    राज्यातील सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जातिवाचक गावांची नावे बदलून त्याऐवजी महापुरूषांची नावे देण्यात येणार होती. जोतिबा फुले, रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी राहू महाराज, अण्णाभाऊ साठे, समता, सिद्धार्थ अशी नावे द्यायची होती. याचीच अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली.