दौंडमधील ‘त्या’ कार्यकर्त्यांचे धाबे दणालले ; ‘दैनिक नवराष्ट्र’ च्या वृत्ताचा दणका

"दौंड तालुक्यात एजंटांचा सुळसुळाट" या मथळ्याखाली दिनांक ३१ ऑगस्टच्या दैनिक नवराष्ट्र मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तामुळे दौंड तालुक्यातील एका संघटनेच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणालले आहेत.

  वरवंड:“दौंड तालुक्यात एजंटांचा सुळसुळाट” या मथळ्याखाली दिनांक ३१ ऑगस्टच्या दैनिक नवराष्ट्र मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तामुळे दौंड तालुक्यातील एका संघटनेच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणालले आहेत. तसेच या एजंटांच्या सुळसुळाटाला वाचा फोडल्याबद्दल प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी दैनिक नवराष्ट्रचे आभार मानले आहेत.

  -राजकीय संघटनेच्या माध्यमातून काम
  दौंड तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.या संघटनांमध्ये काही दिव्यांग राजकीय संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत.तर काही प्रहारच्या माध्यमातून काम करत आहेत. तर काही संघटना विरहित काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र काही दिव्यांग वैयक्तीक लाभासाठी आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे.त्यातूनच अनुभव नसलेल्या दिव्यांगाला अपंगांचे प्रमाणपत्र मिळवून द्यायचे असेल,तर मग कमी टक्केवारी असेल तर जास्त टक्केवारी वाढवून देण्यासाठी डॉक्टरला जास्त पैसे द्यावे लागतात,असे सांगून पैसे उकळले जातात.

  -खरे दिव्यांग लाभापासून वंचित
  यामुळे काही दिव्यांगांचा एजंट व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर काही दिव्यांग एकमेकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत असुन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. यामुळे अपंग संघटनामध्ये इतर दिव्यांगानी कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी दौंड तालुक्यात खरे दिव्यांग लाभापासून वंचित आहेत. तर काही अल्प प्रमाणात असूनही, तरी कित्येक दिवसांपासून दिव्यांगाचे लाभ घेत आहेत. यासाठी दिव्यांग संघटना व प्रशासन यांच्या माध्यमातून खऱ्या दिव्यांगांना लाभ मिळावा.तसेच नव्या दिव्यांगांची आर्थिक लूट करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट थांबवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  दिव्यांगांना मानधन मिळण्यासाठी त्यांना रेशनिंग कार्ड, बँक पासबुक, आधारकार्ड, फोटो व अपंग प्रमाणपत्र ह्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र काही वेळा दिव्यांगा जवळ सगळे कागदपत्र उपलब्ध नसल्याने ही कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.यासाठी तहसीलदार कार्यालय, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कार्यालयातून दिव्यांगांच्या कामाला गती देणे गरजेचे आहे.यामुळे एजंटगिरी करणाऱ्यांवर आळा बसणार आहे.

  प्रहार संघटनेमध्ये असे एजंट असतील तर,अशा एजंटांची त्वरित हकालपट्टी करण्यात येईल.आहे.प्रहारचे नाव वापरून तोतया व्यक्तींकडून दिव्यांगाची फसवून होत असल्यास अशा व्यक्तींवर पोलिसांत तक्रार केली जाईल.

  - धर्मेंद्र सातव, पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष , प्रहार संघटना.