राज्यासह देशात पुढील दोन तीन दिवस उष्णतेची लाट असणार, भारतीय हवामान विभागाचा इशारा

यावर्षी विक्रमी उष्णतेची नोंद झाली आहे. राज्यात यावर्षी उष्णतेच्या लाटेने नवीन एक विक्रमाची नोंद केली आहे. दरम्यान, पुढील दोन तीन दिवसात राज्यासह देशात उष्णेतेची लाट असेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 आणि 15 मे रोजी भारतात उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हमाना विभागाने केलं आहे.

    मुंबई : सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळं सर्वंत्र गर्मी, उष्णता, उकाडा तसेच अंगाची लाही लाही होत आहे. कधी एकदा पाऊस येतोय असं सर्वांना वाटत आहे. यावर्षी विक्रमी उष्णतेची नोंद झाली आहे. राज्यात यावर्षी उष्णतेच्या लाटेने नवीन एक विक्रमाची नोंद केली आहे. दरम्यान, पुढील दोन तीन दिवसात राज्यासह देशात उष्णेतेची लाट असेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 आणि 15 मे रोजी भारतात उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हमाना विभागाने केलं आहे.

    दरम्यान, पुढील दोन दिवसांत देशातील काही भागात पावसाचा अंदाज सुद्धा हवामान विभागने वर्तविला आहे. भारताच्या पूर्व भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये शनिवारपासून तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. 16 आणि 17 मे रोजी जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाट व गारांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 आणि 17 मे रोजी उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागात हलक्या स्वरूपात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    आधीच अंगाची लाही लाही होत असताना, आता उष्णतेची लाट सुद्धा येणार आहे. देशाच्या वायव्य आणि मध्य भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल. येत्या तीन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल. असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.