मुंबईकरांसाठी चिंतेची बाब; एका दिवसात जवळपास 3 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. शनिवारी राज्याच तब्बल २ हजार ८१३ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत १,७४५ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे(The number of corona patients has increased in Mumbai).

    मुंबई : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. शनिवारी राज्याच तब्बल २ हजार ८१३ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत १,७४५ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे(The number of corona patients has increased in Mumbai).

    शनिवारी राज्यात २९२२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर १३९२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४४,९०५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४% झाले आहे. राज्यात एक करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१२,७८,८४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,०७,६३१ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत दिवसभरात झालेल्या १४ हजार २२७ कोविड चाचण्यांमधून १७४५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ८८८ रुग्ण बरे झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे.

    सक्रिय रुग्णांची संख्या १,००४७ इतकी नोंदविण्यात आहे. तर, दिवसभरात रुग्णालयामध्ये ९९ रुग्णांला दाखल करावे लागले. तर ११ जणांना ऑक्सिजनची आवश्यक्ता लागली. सापडलेल्या रुग्णापैकी १६४६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती, अशी माहिती पालिकेच्या अहवालातून समोर आली.