दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली; रेल्वे, एसटी स्थानकांवर प्रवाशांची तूफान गर्दी

दिवाळीचा सण कुटुंबांबरोबर एकत्रपणे साजरा करण्यासाठी नोकरी, कामानिमित्त पुण्यात असलेल्या चाकरमान्यांना घराचे वेध लागले आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर वाकडेवाडी ही बसस्थानके आणि रेल्वे स्थानक येथे दररोज प्रवाशांची तूफान गर्दी होत आहे.

    पुणे : दिवाळीचा सण कुटुंबांबरोबर एकत्रपणे साजरा करण्यासाठी नोकरी, कामानिमित्त पुण्यात असलेल्या चाकरमान्यांना घराचे वेध लागले आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर वाकडेवाडी ही बसस्थानके आणि रेल्वे स्थानक येथे दररोज प्रवाशांची तूफान गर्दी होत आहे. मिळेल त्या वाहनाने घर गाठण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. गर्दीचे हे लोंढे पाहून सुरक्षेच्या काळजीने रेल्वे व एसटीचे प्रशासन तंग झाले असून, सर्व ठिकाणी गर्दीचे नियोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    दिवाळी सुट्टीला गावी जाऊन सण साजरा करण्यासाठी पुण्यातील मंडळी गावाकडे जाण्यास दोन दिवसांपासून निघाली आहे. तसेच विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओढा एसटी वाढला आहे. एसटी बस स्थानकांवर दिवसा तसेत रात्रीच्यावेळी ही गर्दी सुरू आहे. त्यामुळे प्रवाशी मिळेत त्या गाडीने जाणे पसंत करीत आहेत. रेल्वे नसेल तर एसटी व दोन्ही नसेल तर खासगी वाहने, ट्रॅव्हल्स गाठण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. संगमवाडी, वाकडेवाडी, सातारा रस्ता, पद्मावती अशा खाजगी वाहनचालकांनी स्वत:च तयार केलेल्या थांब्यांवर वाहनांची व प्रवाशांची दिवसरात्र गर्दी जमा होत आहे.

    यंदा दिवाळीच्या काळात पुण्यात राज्यासह परराज्यात जाणा-या प्रवाशांची संख्या वारंवार वाढत आहे. शनिवार सुट्टी तर लगेच रविवारी लक्ष्मी पूजन असल्याने दोन दिवसांपासूनच गावी जाण्याच्या तयारी असलेल्या प्रवाशी मिळेल त्या गाडीने जाणे पसंत करीत आहे. त्यात शुक्रवारी एसटी बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर गावी जाणा-या प्रवाशांची संख्या हजारोनी वाढली आहे. त्यामुळे पुणे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने यंदा विशेष पथकाची निर्मिती केली आहे. तर एसटी महामंडळाने वाहतूक नियंत्रक नेमणूक केली आहे.

    दिवाळीत प्रवाशांच्या सोयीसाठी रेव्वे विभागाच्या वतीने गर्दीचे योग्य नियोजन केले असून, पुणे येथून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यात प्रवाशांची मागील वर्षी पेक्षा जास्त संख्या वाढली आहे. नयमित सव्वा लाख प्रवाशी प्रवास करीत असतात. मात्र दिवाळीत ६० हजारांनी प्रवाशांची संख्या वाढली असून १ लाख ८० हजार प्रवाशी जात आहेत. यासाठी विशेष पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एक रेल्वे अधिकारी तर सीआरपीएफ, आरपीएफ कर्मचारी नेमणूक केली असून, पुणे स्टेशनवर चोख बंदोस्त करून काही उपाययोजना देखील आखण्यात आल्या आहेत.

    - डॉ. मिलिंद हिरवे, रेल्वे विभाग. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे