ओबीसीचे आरक्षण घालवणाऱ्या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – विजय चौधरी

भविष्यात हे महाविकास आघाडी सरकार ओबीसी बद्दल असलेले शैक्षणिक व इतर आरक्षण देखिल काढण्याचा मागे आहे. ओबीसी समाज या सरकारला कधीही माफ करणार नाही आणि ओबीसी समाज न्याय मिळेपर्यंत शांत देखिल बसणार नाही भविष्यात आरक्षण मिळण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईप असे ओबीसींचे नेते विजय चौधरी यांनी बोलताना सांगितले

    नंदुरबार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारने ओबीसींना संपवण्यासाठी ओबीसीं समाजाचे राजकीय आरक्षण संपवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात जे ओबीसी नेते आहे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.

    मध्यप्रदेश मध्ये शिवराज सिंह चव्हाण यांच्या सरकारने ओबीसींना राजकीय आरक्षण दिले परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण रद्द केले या सरकारच्या नाकर्तेपणामुळे व तसेच इंटेरियर डाटा न दिल्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे . ओबीसी समाजाच्या नावावर राजकीय पोळी-भाजायची आणि त्यांना संपवण्याचे षड्यंत्र या सरकारने केले आहे. ओबीसी विरोधक धोरण व ओबीसी समाजाबद्दल असलेल्या द्वेषामुळे आरक्षण रद्द झाले आहे. भविष्यात हे महाविकास आघाडी सरकार ओबीसी बद्दल असलेले शैक्षणिक व इतर आरक्षण देखिल काढण्याचा मागे आहे. ओबीसी समाज या सरकारला कधीही माफ करणार नाही आणि ओबीसी समाज न्याय मिळेपर्यंत शांत देखिल बसणार नाही भविष्यात आरक्षण मिळण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईप असे ओबीसींचे नेते विजय चौधरी यांनी बोलताना सांगितले.