ओबीसी आरक्षण दोन्ही सरकारच्या वेळकाढूपणामुळेच गेले; किशोर मासाळ यांची टीका

ओबीसी आरक्षण दोन्ही सरकारच्या वेळकाढूपणामुळेच गेले असल्याची टीका, ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केली. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाची बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी मासाळ बोलत होते.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ओबीसी आरक्षण दोन्ही सरकारच्या वेळकाढूपणामुळेच गेले असल्याची टीका, ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केली. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाची बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी मासाळ बोलत होते.

    यावेळी किशोर मासाळ म्हणाले, शेजारी मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाचा विचार होतो आणि महाराष्ट्रात होत नाही. एवढा विचार ओबीसी समाजाला येत नाही, एवढा वेडा समाज राहीला नाही, मंडल आयोगाला विरोध करणारे, इम्पेरिकल डाटाला विरोध करणारे आणी डाटा जमा करायला वेळकाढूपणा करणारे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

    ओबीसी समाजाच्या ताटात स्वातंत्र्यानंतर फक्त संघर्षच पडला आहे. लाखो ओबीसी प्रतिनिधींची हत्या करण्याचे षड्यंत्र या देशातील राजकीय ताकद करत आहे. म्हणून हा डाव ओळखून महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर येणे गरजेचे आहे आणि ते पक्ष आपापल्या परीने आंदोलनाची नौटंकी करताना दिसत आहेत. ती नौटंकी थांबवून ओबीसी बाबत धोरणात्मक निर्णय होणे अवश्यक आहे.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी २७ % आरक्षणासहीत जागा वाटप करण्याचा ठराव संमत करण्यात आला व बामसेफ व वामन मेश्राम यांनी ओबीसी समाजासाठी भारत बंदची हाक दिली. या दोन्ही संघटना व नेत्यांचे अभिनंदनपर ठराव पुण्यात ओबीसी सेवा संघाने घेतला. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी अशा प्रकारचे ठराव करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सवतीचे प्रेम दाखवणार्‍या पक्षाला त्यांची जागा ओबीसी समाज दाखवणार असल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांनी सांगितले.

    निव्वळ नोटंकी नको, धोरणात्मक निर्णय हवा, यासाठी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून नौटंकीबाजांना जाब विचारणार असल्याचे यावेळी संघटनेने जाहीर केले.

    यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा हनुमंतराव सुतार, प्रदेश अध्यक्ष तात्यासाहेब देडे , युवक प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ, कार्याध्यक्ष सचिन शाहीर, सचिव भारत भोंग, नानासाहेब टेंगले,अभिजीत काळे ,संतोष राऊत, नवनाथ राणे,नुरजहाॅ सय्यद,ज्योती कुटे,शुभांगी कादबाने , नंदीनी गायकवाड, प्रतिभा ढेंगळे, विकास साळुंके,उज्वला खोमणे, सारिका आटोळे, महेश गायकवाड ,नानासाहेब मदने, आकांक्षा कुंभार,दादासाहेब दांगडे, दादा टेंगले,सोनल नागरगोजे,मिननाथ भोकरे ,नाना कुदळे, निता फरांदे,आप्पा रेणके,भारत सद्गुरु,विनायक गवळी,संजय भंडलकर,प्राजक्ता रासकर,वैष्णवी गायकवाड, नितीन पिंपळशेंडे,सचिव संदिप आढाव,सुरज खोमणे,नितीन मासाळ,मोनाली महाजन, पल्लवी शहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.