विविध समस्याबाबत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

    कल्याण : कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. या दरम्यान कल्याण पूर्वेतील विविध समस्या आयुक्तांकडे मांडण्यात आल्या. कल्याण पूर्वेत झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. येणाऱ्या काळात कल्याण पूर्वेची अजून दयनीय अवस्था होऊ नये असे सांगितले असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिली आहे. तसेच सफाई कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आहे. या समस्येविषयी आयुक्तांना सांगितले असल्याची माहिती विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली आहे.

    कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. या वेळी विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, विधानसभा समन्वयक मल्लेश शेट्टी, शहर प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक पप्पू पिंगळ, शिवसेना उपशहर प्रमुख नवीन गवळी आदी उपस्थित होते. या दरम्यान केडीएमसी आयुक्तांना कल्याण पूर्वेतील समस्या सांगण्यात आल्या. कल्याण पूर्वे त कचरा समस्या आहेत. खाजगी ठेकेदाराची नियुक्ती करुन समस्या सोडविण्यात यावी. अंतर्गत रस्तेांची कामे झाली पाहिजे. जे रस्ते सहा फुटाचे आहेत. ते नऊ फूटाचे झाले पाहिजेत. जे नऊ फूटाचे आहे. ते १२ फूटाचे झाले पाहिजे. अनेक भागात पाणी कमी दाबाने येते. त्यासाठी काय केले पाहिजे. हे सांगण्यात आली. कल्याम पूर्वेतील लोकसंख्या वाढत आहे. जे काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील त्या आयुक्तांनी कराव्यात अशी मागणी केली गेली.

    दरम्यान पाणी सोडणारे महापालिकेचे वॉलमन आहेत. त्यांना सण आणि सार्वजनिक सुट्टा मिळतात. त्यांच्या अन्य सुट्या रेग्यूलर केल्या जात नाही. सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना बदली रजा दिली जावी अशी मागणी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी आयुकतांकडे केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी गायकवाड यांना दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.