राज्यात सुरु असलेली राजकीय धुळवड दुर्देवी, व्यक्तिगत आरोपांची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही : बाळासाहेब थोरात

व्यक्तिगत राजकारण करू नये. राजकारण हे विकासाचे असावे. व्यक्तिगत आरोप आणि त्यातून होणार द्वेष हा सर्वांना मारक असतो. म्हणून होळी एक दिवसाची, धूळवड एक दिवसाची साजरी करावी. प्रेमाचे संबंध सर्वांचे असावे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपांची धूळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही असेही ते म्हणाले.

    मुंबई : होळीचा सण (Holi Festival 2022) हा दोन दिवसांचा सण आहे. तो काही वर्षभर साजरा करणारा सण नाही. राज्यात सुरु असलेली राजकीय धुळवड (Political Holi) ही अत्यंत दुर्देवी आहे. लोकशाहीला हानिकारक असल्याची टीका काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)  यांनी विरोधकांवर केली.

    व्यक्तिगत राजकारण करू नये

    ते पुढे म्हणाले, व्यक्तिगत राजकारण करू नये. राजकारण हे विकासाचे असावे. व्यक्तिगत आरोप आणि त्यातून होणार द्वेष हा सर्वांना मारक असतो. म्हणून होळी एक दिवसाची, धूळवड एक दिवसाची साजरी करावी. प्रेमाचे संबंध सर्वांचे असावे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपांची धूळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही असेही ते म्हणाले.

    पालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू

    विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत धूळवड साजरी केली आहे. दिवसभरात राजकीय क्षेत्रात टीका-टीप्पणीची धूळवड नेत्यांनी खेळली आहे. यामध्ये आगामी पालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. तर भाजपा महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही असा निशाणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. भाजप उधळत असलेले रंग बनावट आहेत भाजपाचा रोजचाच शिमगा सुरु आहे. असा टोला राऊतांनी लगावला. राऊतांच्या या टिकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्यूत्तर दिले. आमचा रंग ओरिजनल आहे असा निशाणा त्यांनी लगावला.