प्रभागरचनेत खुल्या गटाचाच बोलबाला ; इंदापूरमधील अनेक प्रभागांची मोडतोड ,  इच्छुकांचा  भ्रमनिरास

यंदाच्या नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  प्रभागांचे आरक्षण जाहिर करण्यात आले. ९ ठिकाणी  सर्वसाधारण, ८ ठिकाणी सर्वसाधारण स्त्री, १ ठिकाणी अनुसूचित जाती व सर्वसाधारण व दोन ठिकाणी अनुसुचित जाती स्त्री उमेदवारांना संधी मिळाली आहे.

    इंदापूर : यंदाच्या नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  प्रभागांचे आरक्षण जाहिर करण्यात आले. ९ ठिकाणी  सर्वसाधारण, ८ ठिकाणी सर्वसाधारण स्त्री, १ ठिकाणी अनुसूचित जाती व सर्वसाधारण व दोन ठिकाणी अनुसुचित जाती स्त्री उमेदवारांना संधी मिळाली आहे.  इंदापूर नगरपरिषदेच्या नव्या इमारतीत उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे अध्यक्षतेखाली दोन बालकांच्या  आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या प्रभाग रचनेत अनेक प्रभागांची मोडतोड झाल्याने प्रबळ इच्छुकांना मोठा  धक्का बसला आहे.

    असे आहे प्रभाग  आरक्षण
    प्रभाग क्र. १ : अ) अनुसुचित जाती स्त्री, ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. २ अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. ३ अ) : सर्वसाधारण स्त्री,ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. ४ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब), सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. ५ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. ६ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. ७ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. ८ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. ९ : अ ) अनुसूचित जाती स्त्री, ब) सर्वसाधारण.
    प्रभाग क्र. १० : अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण स्त्री.

    अशी आहे प्रभाग रचना
    प्रभाग क्र.१ –  महतीनगर, पोलीस लाईन, इरिगेशन कॉलनी, दत्तनगर.
    प्रभाग क्र.२ – श्रीनाथ सोसायटी, बस स्थानक, इंदापूर महाविद्यालय
    प्रभाग क्र.३ – सोनाईनगर, भारती टॉवर, जय भवानी मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, गणेशनगर, सावतामाळीनगरचा काही भाग.
    प्रभाग क्र.४ – सावतामाळीनगर, काझी गल्ली, नेहरु चौक, मोमीन गल्ली, जौंजाळ वाडा, कासारपट्टा, कुरेशी गल्ली,
    प्रभाग क्र.५ – अंबिकानगर, नगरपरिषद कार्यालय परिसर, पिसे गल्ली, बाजारतळ, खडकपूरा, मारुती मंदिर परिसर.
    प्रभाग क्र.६ – मंडई परिसर, सातबोळ, माळी गल्ली, तेली गल्ली, पिसे वाडा, शेख मोहल्ला, बटरगल्ली, रामदास पथ.
    प्रभाग क्र. ७ – सिध्देश्वर मंदिर परिसर, ठाकरगल्ली, कांबळे गल्ली, व्यंकटेशनगर (पूर्ण).
    प्रभाग क्र. ८ – श्री संत रोहिदास मंदिर परिसर, जामदार गल्ली, कुंभार गल्ली, जुने पोस्ट ऑफिस, जुने तहसिल कार्यालय परिसर, राजेवलीनगर, एस. टी. डेपो परिसर, दुधगंगा परिसर, बाब्रस मळा.
    प्रभाग क्र. ९ – सरस्वतीनगर, शाहूनगर, शिवाजीनगर
    प्रभाग क्र. १० – डॉ. आंबेडकरनगर, साठेनगर, बजरंगनगर, आठभाई मळा.