Clashes between two groups, involved in crime for no reason; Planted wrong clause; Finally granted bail
Pune Crime

  पुणे : ताडीवाला रस्ता परिसरात तडीपार गुन्हेगाराने राडा घालत दहशत माजवून दोन तरुणांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला. घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला नोव्हेंबर २०२३ मध्ये तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरात वावरत असल्याचे दिसून आले.

  तडीपार गुन्हेगाराची मुजोरी

  याप्रकरणी एका १८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून अजय उर्फ हॅलो लक्ष्मण कांबळे (वय २१, ताडीवाला रस्ता) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली असून, हा प्रकार ११ फेब्रुवारीला रात्री सव्वानऊच्या सुमारास ताडीवाला रस्ता परिसरात घडली. दरम्यान, परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी ११ फेब्रुवारी २०२३ या दिवशी त्याला शहर आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यानंतरही तो शहरात विनापरवाना वावरत असल्याचे दिसून आले.

  मित्रासह दुचाकीवरून घराकडे

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण त्याचा मित्रासह दुचाकीवरून घराकडे जात होता. त्यावेळी आरोपीने तक्रारदाराला दुचाकी थांबविण्यास सांगितली. ‘काय रे, तुला मस्ती आली आहे का, तुझा बाप आता जेलमध्ये आहे. आज मी तुला आणि तुझ्या बहिणीला बघतोच. आता फक्त मीच ताडीवाला रोडचा भाई आहे. बघतोच कोण मध्ये येतो,’ अशी धमकी देत तरुणाने कोयत्याने तक्रारदाराच्या कपाळावर मारून वार केला.

  तरुणाने जीव वाचविण्यासाठी तेथून काढला पळ

  त्यानंतर तक्रारदार आणि त्याच्यासोबतच्या तरुणाने जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला. त्यावेळी त्याने दोघांचा पाठलाग केला. ‘थांब तुला आज खल्लासच करतो,’ असे म्हणत हातातील कोयता हवेत भिरकावीत, परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकाराला घाबरून लोकांनी त्यांची दुकाने आणि घरे बंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.