The owner of the car, which has been providing uninterrupted service for 34 years, celebrated his birthday by cutting a nice cake

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील मारुती व्हॅन प्रेमी कारमालक रंजन ढोमने आपल्याला ३४ वर्षे दिलेल्या अविरत आठवणीला उजाळा देत चक्क आपल्या मारुती व्हॅनचा वाढदिवस साजरा केला आहे. यासाठी तिला सजवून मारुती व्हॅन समोर थाटात केक कापण्यात आला. औक्षण करून ढोमणे कुटुंबानी एक प्रकारे सेलिब्रेशन करत साजरा केला आहे.

  मोहाडी : कोण कुणाचा वाढदिवस साजरा करेल याचा काही नेम नाही. भंडाऱ्यातील रंजन यांनी त्यांच्या मारुती व्हॅनचा ३४ वा वाढदिवस साजरा केला. कित्तेक वर्षांपासून ती आपल्याला प्रवासात मदत करते. म्हणून कारसमोर चक्क त्यांनी केक कापला.

  चक्क मारुती व्हॅनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ऐकून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आतापर्यंत आपण सजीवांचे वाढदिवस बघितले. काही लोकांनी तर कुत्रा, कोंबड्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील मारुती व्हॅन प्रेमी कारमालक रंजन ढोमने आपल्याला ३४ वर्षे दिलेल्या अविरत आठवणीला उजाळा देत चक्क आपल्या मारुती व्हॅनचा वाढदिवस साजरा केला आहे. तुम्हाला दृष्यात नटलेली, सजलेली मारुती व्हॅन आहे. ती नटलेली – सजलेली आहे, कारण आज तिचा वाढदिवस होता. तो ही ३४ वा !

  अनेक घटनांची साक्षीदार
  मोहाडीतील युवा किराणा व्यापारी रंजन ढोमने यांनी आपल्या मारुती व्हॅनचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा केला आहे. ढोमने कुटुंबाने १९८७ साली ही मारुती व्हॅन बुक केली होती. १९९० ती ढोमने कुटुंबाची सदस्य झाली. त्या साली मोहाडीत एकच मारुती व्हॅन असल्याने लोकं तिला बघण्यासाठी ढोमने यांच्याकडं यायचे. अनेक सुखद प्रसंग असो की सुख-दुःख तिच्या संगतीने त्यांनी प्रवास केला. अगदी देवदर्शनाची ती साक्षीदार ठरली.

  थाटात केक कापला
  आज तिला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिच्या अनेक आठवणी उजाळा देत तिच्या कार प्रेमी मालकाने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यासाठी तिला सजवून मारुती व्हॅन समोर थाटात केक कापण्यात आला. औक्षण करून ढोमणे कुटुंबानी एक प्रकारे सेलिब्रेशन करत साजरा केला आहे. आता जणू ती घरचा सदस्यच झाली आहे. तिला विकण्याची मुळीच इच्छा नसल्याचे मालक रंजन ढोमने, रंजनची आई किरण ढोमने व रंजनची ताई कामिनी ढोमने सांगतात. आज वाहतुकीचे अनेक नियम आले आहेत. गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट, गाडीची लाइफ आदी गोष्टी महत्वाचा मानल्या जात आहे. तरीही घरचा सदस्य असल्यानं तिला विकायचं नाही, अस मालकाने ठरविलेल आहे.