मंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका पक्षाने समजून घेतली पाहिजे

‘मी गुवाहाटीला गेलो असे वृत्त आले होते, पण आता मी रत्नागिरीतील पाली येथील घरीच असून शिवसेनेतच आहे. शिवसेनेच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस त्यात तांत्रिक बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल; पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    रत्नागिरी : मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका (Role) पक्षाने समजून घेतली पाहिजे. बंडखोर आमदारांचे गैरसमज दूर करायला हवेत. यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेचे (Shivsena) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

    ‘मी गुवाहाटीला गेलो असे वृत्त आले होते, पण आता मी रत्नागिरीतील पाली येथील घरीच असून शिवसेनेतच आहे. शिवसेनेच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस त्यात तांत्रिक बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल; पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

    एकनाथ शिंदे यांची सुरुवातीपासूनच नेमकी भूमिका काय आहे, हे पक्षाला किंवा पक्षप्रमुखांना समजली नाही. ती भूमिका मांडणे आवश्यक आहे. या घडामोडींविषयी माझी भूमिका शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यापुढे बैठकीमध्ये मांडली आहे. पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. आमच्या लोकांमधील गैरसमज दूर करायला हवेत. या सगळ्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेनेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मी पक्ष जोडणारा असून, तोडणारा नाही, असेही सामंत म्हणाले.