The pavilion collapsed during a community wedding ceremony in Palghar Three people, including the bride, were injured

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात रविवारी सामुदायिक विवाह सोहळ्या आयोजित करण्यात आला होता. यावेळी वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. त्यामुळे एका वधूसह तीन जण जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले(The pavilion collapsed during a community wedding ceremony in Palghar Three people, including the bride, were injured ).

    पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात रविवारी सामुदायिक विवाह सोहळ्या आयोजित करण्यात आला होता. यावेळी वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. त्यामुळे एका वधूसह तीन जण जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले(The pavilion collapsed during a community wedding ceremony in Palghar Three people, including the bride, were injured ).

    डहाणू तालुक्यातील ऐना गावात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १२५ जोडप्यांसह त्यांच्या नातेवाईकांनी सहभाग घेतला होता. लग्नाच्या विधी सुरू असतानाच वातावरणात अचानक बदल होत सोसायट्याचा वादळी वारा आला. त्यामुळे मंडपाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी एका वधूसह काहीजण जखमी झाले आहेत.

    सनई चौपड्यांचे सुर, शुभमंगल सावधान, मंगलाष्टकाच्या घोषात डहाणूमध्ये १२५ जोडपी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकली निमित्त होते. शिवसेना आणि केसरी फाऊंडेशन यांच्याकडून डहाणू तालुक्यातील ऐना येथे आदिवासी समाजातील १२५ जोडप्यांचा हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने पार सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.

    कोरोना काळात दोन वर्षे लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्याने हजारो लग्न समारंभ रखडले होते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला देखील याचा मोठा फटका बसला होता. त्याचप्रमाणे लग्नसमारंभावर होणारा अनावश्यक वारेमाप खर्च टाळण्यासाठी शिवसेना पालघर जिल्हा आणि सुशील चुरी यांच्या केसरी फाऊंडेशनमार्फत डहाणू तालुक्यातील ऐना येथे डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि पालघर या तालुक्यातील १२५ वधू-वरांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यातील जोडप्यांना केसरी फाऊंडेशन यांच्याकडून कपडे, कन्यादान व सर्व संसारपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

    त्याचप्रमाणे पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळींसाठी सुग्रास जेवणाची सोय करण्यात आली होती. या विवाह सोहळ्याला आमदार श्रीनिवास वनगा, जि. प.अध्यक्षा वैदेही वाढाण, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर, पंचायत समिती उपसभापती पिंटू गहला, कामद पवार, नीलम म्हात्रे, मनीषा पिंपळे, प्रणिता चुरी, स्मिता पवार उपस्थित होते.