निशिकांत भोसले- पाटील यांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन ; सोमवारी भाजपाचे जिल्ह्यातील सर्व नेते इस्लामपुरात!

सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या होमपिच वर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते एकवटणार आहेत.सोमवारी दिवसभरात प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात सांगली,हातकणंगले लोकसभा व होणार्‍या विधानसभा निवडणुकांची रणनिती ठरणार आहेत.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह लोकसभेच्या निमित्ताने चर्चा होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

  विनोद मोहिते,इस्लामपूर : सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या होमपिच वर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते एकवटणार आहेत.सोमवारी दिवसभरात प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात सांगली,हातकणंगले लोकसभा व होणार्‍या विधानसभा निवडणुकांची रणनिती ठरणार आहेत.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह लोकसभेच्या निमित्ताने चर्चा होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

  राज्याचे कामगार मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डाॅ.सुरेश खाडे,खा.संजय पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी,विधानसभा,लोकसभा समन्वयक, निवडणुक प्रमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी सोमवारी दिवसभरात प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात सांगली,हातकणंगले लोकसभा व होणार्‍या विधानसभा निवडणुकांची रणनिती ठरणार आहेत.

  गेल्या ५० वर्षापासुन पेठ- सांगली रस्ता रुंदीकरण व काॅक्रीटीकरण व्हावा अशी अपेक्षा सांगली जिल्ह्यासह अन्य प्रवाशी वर्गाची होती. सातत्याने मागणी व आंदोलने ही झाली.केंद्रातील भाजपा सरकारने खर्‍या या मागणीची व अपेक्षाची पुर्तता केली.केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांनी ८६०.४५ कोटी इतका निधी देऊन कामाचे उदघाटन काही महिण्यापुर्वी केले होते.

  आता राज्याचे कामगारमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री या कामाचा प्रत्यक्षात शुभारंभ सोमवारी सकाळी ११ वाजता कारंदवाडी येथून करणार आहेत.दुपारी ११:३० वा.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी वाळवा तालुक्यातील वाळवा,पडवळवाडी,बावची,नागांव,ढवळी,शिगांवची सुधारणा करणेसाठी ७१२.५० लक्ष इतका निधी दिला आहे. या कामाचे बावची येथील शिवाजी चौकात उदघाटन करणार आहेत.त्याचबरोबर बावची येथील मातंग समाजासाठी २५ लाख रुपये खर्चुन बांधलेल्या समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा ना.खाडे यांच्या हस्ते होणार आहे.सायंकाळी ५ वाजता ताकारी रोडवर खुले नाटयगृह येथे केंद्र शासनाचा विकसीत भारत रथ येणार आहे त्यास भेट देणार आहे. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी इस्लामपुर शहरात जनसेवेसाठी उभा केलेले भाजपाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ना.खाडे यांच्या हस्ते होणार आहे.

  दरम्यान दुपारी १२ ते ५ या सहा तासात प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात २०२४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीची भाजपाची रणनिती ठरणार आहे,निशिकांत भोसले – पाटील यांच्यावर भाजपाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपाविल्यापासुन निशिकांत दादांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघ पिंजुन काढत आढावा घेतला.

  संघटनात्मक रचनेवर भर दिला. केंद्रातील योजना व मोदीसरकारचे काम घराघरात पोहचविण्याचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याला कानमंत्र देत जिल्ह्याच्या भाजपा मध्ये ऊर्जा निर्माण केली आहे.त्यांनी हातकणंगले व सांगली लोकसभा सह जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ सर्वाना बरोबर घेऊन जिंकण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार मास्टर प्लॅन तयार केल्याचे समजते.

  या सहा तासामध्ये राज्याचे कामगार मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डाॅ.सुरेश खाडे,खा.संजय पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी
  पदाधिकारी,विधानसभा,लोकसभा समन्वयक, निवडणुक प्रमुख,जिल्हाकार्यकारिणी पदाधिकारी,मंडल अध्यक्ष,प्रकोष्ठ,सेल संयोजक यांची बैठक होऊन होणार्‍या लोकसभा,विधानसभा मतदार संघाची दिशा ठरणार आहे.

  बैठकीस ना.सुरेश खाडे,खा.संजय पाटील,आ.सुधीर गाडगीळ,आ.गोपीचंद पडळकर,भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे,भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार,भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा निताताई केळकर,हातकणंगले लोकसभा निवडणुक प्रमुख सत्यजीत देशमुख,सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दिपक शिंदे,माजी आमदार राजेंद्र देशमुख,विलासराव जगताप,पृथ्वीराज देशमुख,भगवानराव सांळुखे,नितिन शिंदे,दिनकर पाटील,भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, विधानसभा निवडणूक प्रमुख संग्राम देशमुख,प्रभाकर पाटील,सम्राट महाडीक,रवि तम्मनगौंडा पाटील,मोहन वनखंडे,सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल पाटील,सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डाॅ.उषाताई दशवंत, इस्लामपुर नगरपरिषदेचे माजी पक्षप्रतोद विक्रम पाटील आदिसह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत.