पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या ग्रामीण भागातील इच्छुकांचे हाल, पावसामुळं रात्री चिखलात करावा लागला मुक्काम, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतरही हालाला जबाबदार कोण?

मुंबई पोलीस भर्ती परीक्षा देण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील मुलांचे रात्री हाल झाले होते. राज्यातील विविध भागातून आलेले हे विद्यार्थी रात्री फुटपाथावर झोपले होते. मात्र यावेळी जोरात पाऊस पडला तेंव्हा सर्व विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. अशा निर्दयपणामुळे उद्या काही बरं वाईट घडल्यास जबाबदार कोण ? असा सवाल मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे.

    अखिल चित्रे यांचं ट्विट

    मुंबई पोलीस भर्ती परीक्षा देण्यासाठी आलेले असंख्य मुलं फुटपाथवर आणि फ्लायओवर खाली झोपण्यासाठी विवश झाले. काल रात्री ह्या मुलांच्या त्रासात भर पडली जेव्हा रात्री अचानक पाऊस पडायला लागले. राज्याच्या मा.मुख्यमंत्री ,मा.उपमुख्यमंत्री तसेच पोलीस महासंचालक ह्यांना पत्र देऊन सुद्धा अद्याप सरकारने पोलीस भरतीसाठी आलेल्या ह्या तरूणांच्या गैरसोयकडे दुर्लक्षच केलं आहे. अशा निर्दयपणामुळे उद्या काही बरं वाईट घडल्यास जबाबदार कोण ? त्यांच्या सुरक्षेसाठी बॅरेगेट्स पण महाराष्ट्र सैनिकांनी लावून घेतले.