
‘रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. तसेच त्यांनी बहिणाबाई चौधरी यांचा वारस जपला अशी भावना आहे. निसर्गात रमाणारा कवी अशी महानोर यांची ओळख होती. तो कवी आज निसर्गाला व सर्वाना सोडून कायमचा निघून गेला.
पुणे : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. तरल काव्यासाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं निधन झालंय. (N D Mahanor Passes Away) वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, निसर्गात रमणारा कवी अशी त्यांची ओळख होती. तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा त्यांनी वारसा जोपासला व चालवला होता. दरम्यान, महानोर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (The poet who delights in nature is lost; The songs of ‘Ya’ movies introduced the kindness of nature, what awards did Mahanora get)
पद्मश्री व साहित्य अकादमी पुरस्कारने गौरव…
दरम्यान, ना.धों. महानोर यांचे साहित्य व कवी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच साहित्य क्षेत्रातील सर्वोच्य साहित्य अकादमी पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. ना.धों. महानोर यांची ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली. तसेच त्यांची काही गीते ‘जैत रे जैत’ या चित्रपटासाठी घेतली होती. ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीतं लिहिली, तशा ठससेबाज लावण्याही लिहिल्या. श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही लावणी लोकप्रिय झाली. आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे. तसेच निसर्गात रमणारा कवी हरपला आहे सिनेमांच्या गाण्यांतून निसर्गाच्या सौदर्याची महानोरांनी ओळख करुन दिली.
निसर्गात रमणारा कवी
निसर्गात रमाणारा कवी अशी महानोर यांची ओळख होती. त्यांची गीते ‘जैत रे जैत’ या चित्रपटासाठी घेतली होती. तसेच आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक उत्तम गाणी ना.धों. महानोर यांनी लिहिली. ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. तसेच त्यांनी बहिणाबाई चौधरी यांचा वारस जपला अशी भावना आहे. निसर्गात रमाणारा कवी अशी महानोर यांची ओळख होती. तो कवी आज निसर्गाला व सर्वाना सोडून कायमचा निघून गेला.