Pune Drugs Connection

पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीची येथे मोठी कारवाई करीत तीने ते चार दिवसांत चार हजार कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले. पुणे पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

  पुणे : काल दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थ केमिकल कंपनीत एमडी ड्रग्सचे कनेक्शन असून 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो ड्रग्स सापडले होते. मंगळवारी (दि. 20) कुरकुंभ एमआयडीत अचानक पुणे शहर पोलिसांचा १० गाड्यांचा ताफा येऊन एमआयडीसीत धडकला. एमआयडीसीमधील अर्थ केमिकल कंपनीवर धाड पडल्याने कुरकुंभ एमआयडीसीत नव्हे तर तालुक्यात यामुळे खळबळ उडाली आहे.

  पुणे पोलिसांनी तीन ते चार दिवसांत चार हजार कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

  पुणे पोलिसांची तब्बल दहा पथके देशातील विविध शहरांमध्ये एनसीबीला सोबत घेऊन कारवाई करत आहेत. दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद या प्रमुख शहरासह पुणे पोलिसांचे पथकं अनेक गोडाऊनमध्ये ड्रग्जचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया आणि युवराज भुजबळ या पाच जणांना अटक केली. ड्रग्ज तयार करणाऱ्या इंजिनिअरला ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

  पुण्यातील २००० किलो ड्रग्स रॅकेटचा मास्टरमाईंड कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून ‘सॅम ब्राऊन’ या नावाने फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. या सॅम नावाच्या मास्टरमाईंडचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे.

  दरम्यान, पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचे टार्गेट दिल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीमधून अटक केली आहे. सॅम नावाच्या गृहस्थानेच भुजबळ नावाच्या आरोपीला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिल्याचं सांगितलं जातंय. त्यावरुन भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभ येथे सुरू ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता.

  कुठे-कुठे सापडलं ड्रग्ज?
  १८ फेब्रुवारी रोजी पुण्यातल्या सोमवार पेठेत केवळ २ किलो ड्रग्ज सापडलं होतं.

  १९ फेब्रुवारीला विश्रांतवाडीत १०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज सापडलं.

  यासह दौंडमध्ये ५५० किलो ड्रग्ज सापडलं आहे.

  २० फेब्रुवारीला करकुंभ एमआयडीसीत ११०० कोटी रुपयांचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलं.

  याच दिवशी म्हणजे २० फेब्रुवारी रोजीच पुणे पोलिसांनी दिल्लीत ८०० किलो ड्रग्ज जप्त केलं.

  बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा पुणे पोलिसांनी दिल्लीतच १२०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे.