
कोल्हापुुरातील पन्हाळा पोलिस ठाण्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर येथे एका पोलीस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच महिला काॅन्स्टेबलकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं जिल्हयातील पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी (Kolhapur Police) या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.
कोल्हापुुरातील पन्हाळा पोलिस ठाण्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस ठाण्यातील अधिकार्याने पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी केल्याच या लेखी तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तर, महिला कॉन्स्टेबलने नकार दिल्यानंतर शारीरिक, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप पीडित महिलेने केला आहे. दरम्यान या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. उच्चस्तरीय समितीकडून दोन्ही बाजूंनी चौकशी केली जाणार आहे. या उच्चस्तरीय समितीमध्ये अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई व पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांचा समावेश आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.